दुमडू शकणारा मोबाइल येणार?

न्यूयॉर्क -आयफोनच्या डिझाइनमध्ये ऍपलने सातत्याने बदल केले आहेत. 2020 मध्ये फोल्ड होऊ शकणारा आयफोन बाजारात आणण्याचे ऍपलचे प्रयत्न असल्याची सध्या चर्चा आहे. ऍपले मात्र या बातमीला दुजोरा दिलेला नसला तरी तज्ज्ञांच्या मते, असा फोल्ड होऊ शकणारा आयफोन तयार करण्याचे प्रयत्न ऍपलने सुरू केले आहेत.

यासाठी एलजी कंपनीची मदत ऍपल घेऊ शकते. एलजीने यापूर्वीच दुमडू शकणाऱ्या स्क्रीन यशस्वीपणे तयार केल्या आहेत. त्यामुळे टॅब्लेटसारख्या मोठ्या आकाराचा आणि स्क्रीन दुमडू शकेल असा आयफोन लवकरच तुम्हाला पाहायला भेटला तर आश्‍चर्य वाटू देऊ नका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)