दुभाजक सुशोभिकरणाचे “व्हीडिओ शुटिंग’

पिंपरी – शहरातील विविध भागातील रस्ते दुभाजक पालिकेच्या वतीने कोट्यावधी रूपये खर्च करून सुशोभिकरण केले जाते. परंतु, संबंधित ठेकेदार व्यवस्थित कामे करत नाहीत. त्यामुळे काम सुरू होण्यापूर्वी व काम झाल्यानंतर सुशोभिकरणाचे “व्हीडिओ शुटिंग’ व छायाचित्र काढून ठेवण्याचा निर्णय स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला.

सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड होत्या. सभेच्या अजेंड्यावर प्रभाग क्रमांक अ, ब, फ, व आणि ग या भागातील रस्त्यांमधील दुभाजक सुभोभिकरण व देखभालीचा विषय होते. या कामासाठी स्थायी समितीने 53 लाख 17 हजार रूपयांच्या खर्चाला मान्यता दिली. रस्त्यांमधील दुभाजक सुशोभिकरण व देखभाल ठेकेदाराकडून योग्य पध्दतीने होत नाही. त्यामुळे यापुढे रस्ते दुभाजक सुशोभिकरण करण्यापूर्वी व केल्यानंतर त्याचे फोटो व “व्हीडिओ शुटिंग’ काढण्याची उपसूचना स्थायी समिती सदस्य विलास मडिगेरी यांनी मांडली. शहरातील अंध, अपंगाना पीएमपीएमएल बस पाससाठी अर्ज करण्याची फक्त दोन महिन्यांची मुदत आहे. अंध, अपंगांचे बाराही महिने अर्ज स्वीकारून त्यांना पास देण्याची मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली.

दोन कोटींच्या कामांना मंजुरी
शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी सुमारे 2 कोटी 10 लाख 86 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक 4 कृष्णानगरमध्ये स्पाईन रोड, यशवंतराव चव्हाण रोड, बाहुबली चौक ते स्पाईन रोड व पुर्णानगर परिसरात दिशादर्शक फलक व सीट चेअर्स बसविणे व रस्ते थर्मोप्लास्टिक पेंटने रोड मार्किंग करण्यासाठी सुमारे 30 लाख 43 हजार रुपये, चिंचवड येथील मंजुर विकास योजनेतील 9 मीटर रुंद रस्त्याने बाधित होणारे 85.93 चौरस मीटरचे क्षेत्र खाजगी वाटाघाटीने ताब्यात घेण्यात येणार आहे. त्याच्या मूल्यांकनानुसार 32 लाख 12 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. अंध, अपंग व ज्येष्ठ नागरिकांना पाससाठी सुमारे 1 कोटी 95 लाख 14 हजार रुपयांची रक्कम पीएमपीएमएलला अदा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)