दुबार नोंदणी मिळकती रद्द करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव

पुणे – एकाच मिळकतीसाठी दोनदा मिळकतकर लावलेल्या 15 प्रकरणांचा सुमारे 24 लाख, 99 हजार रुपये थकबाकी निर्लेखित (रद्द) करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. हा मिळकतकर वसूल होणारा असल्याने तो रद्द करण्याचे अधिकार मिळावे, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

महापालिका हद्दीतील मिळकतींना महापालिकेतर्फे मिळकत कर लावला जातो. मात्र, अनेकदा एकाच मिळकतीला दोन बिले दिली जातात. यापैकी एकच बिल भरले जाते, तर दुसरे भरले जात नसल्याने महापालिकेच्या मिळकत कराकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याचे दिसते. त्यामुळे महापालिकेकडे दुबार नोंद असलेल्या मिळकतींच्या थकबाकीचा फुगवटा वाढल्याचा दिसतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही थकबाकी वसूल होणार नसल्याने ती स्थायी समितीच्या मान्यतेने वेळोवेळी शून्य करण्याची तरतूद आहे. त्या आधारे दुबार, चुकीच्या मिळकत करांमध्ये दुरुस्ती करून थकबाकी निर्लेखित करण्याच्या प्रस्तावास यापूर्वी स्थायी समितीने मान्यताही दिली आहे. त्यानुसार, स्थायी समितीने एप्रिल 2018 पर्यंत 2635 मिळकतींची 37 कोटी, 66 लाख रुपये थकबाकी निर्लेखित केली आहे. त्या धर्तीवर शहरातील 15 प्रकरणांची 24 लाख, 99 हजार 816 रुपये थकबाकी रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्‍तांनी स्थायी समितीसमोर ठेवला आहे.

त्यानुसार, मिळकतींची वसूल न होण्याजोगी वार्षिक करपात्र रक्‍कम 25 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास आयुक्‍तांना, करपात्र रक्‍कम 10 ते 25 लाख रुपये असल्यास अतिरिक्‍त आयुक्‍तांना तर, करपात्र रक्‍कम 1 ते 10 लाख रुपयांपर्यंत असल्यास कर आकारणी-कर संकलन प्रमुखांना ती थकबाकी निर्लेखित करण्याचे अधिकार द्यावे, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)