दुबई येथे झालेल्या आंतराष्ट्रीय कराटे स्पर्धेत वैदेही शिंदेचे यश

सातारा जिल्हातील पहिली आठ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय खेळाडू

सातारा – नुकत्याच दुबई येथे झालेल्या आंतराष्ट्रीय कराटे स्पर्धेत चॅम्पियन्स कराटे क्‍लब साताराची खेळाडू वैदेही शिंदे हिने
कुमिते (फाइट) आणि काता या दोंन्ही प्रकारात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक मिळविले. वैदेही शिंदे हिचे वय 7 वर्षे असुन वयाच्या 5 व्या वर्षी ती चॅम्पियन्स कराटे क्‍लब येथे शारीरिक रित्या बळकट आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. तिने वयाच्या 5 व्या वर्षी पहिली जिल्हास्तरीय स्पर्धा खेळली तेंव्हा पासुन तिचा सुवर्ण पदि प्रवास अजुनही चालू आहे.

-Ads-

वैदेहीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू बनण्याचे स्वप्न होते. पण ते तिच्या वयाच्या 7 व्याच वर्षी पुर्ण होईल हे ठाऊक नव्हते. मात्र तिची प्रामाणिक मेहनत आणि तिचे गुरु सेन्सई तमन्ना रिनवा यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यानी घेतलेल्या कठोर परीश्रमाने हे शक्‍य झाले. वैदेही शिंदे एका जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय अशा विविध स्पर्धेमध्ये नाव कमवत सातारा जिल्ह्याचा शान वाढवत जिल्हातील पहिली 8 वर्षा खालील आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरली आहे. तिने आतापर्यंत राष्ट्रीय, राज्यस्तरिय, जिल्हास्तरीय अशा स्पर्धा खेळल्या असुन 10 सुवर्णपदक, 8 रौप्यपदक, 6 कास्यपदक अशी दर्जेदार कामगिरी केली. इयत्ता 2 री या वर्गात शिकते ती कराटे बरोबरच शिक्षणातही चांगल्या प्रगतिपथावर आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)