दुबई येथून आणलेले 3 कोटी रुपयांचे सोने पुणे विभानतळावर जप्त

पुणे- दुबईहून आणलेले तब्बल 10 किलो 175 ग्रॅम वजानाचे 86 सोन्याचे बिस्कीट सीमा शुल्क विभागाने गुरुवारी विमानतळावर जप्त केले. स्पाईसजेटच्या विमानातून आणलेल्या या सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात तीन कोटी रुपये आहे. प्रवाशाने विमानतळावर उतरल्यानंतर तेथील स्वच्छतागृहातील कचरा पेटीमध्ये ठेवलेली ही 86 सोन्याची बिस्किटे मिळून आली.
दुबईहून पुण्यात मोठ्या प्रमाणावर सोने तस्करी करुन आणण्यात येत असल्याची माहिती पुण्यात नव्याने स्थापन केलेल्या महसुल गुप्तवार्ता संचालनालयाला मिळाली होती. याबाबत विमानतळावरील सीमा शुल्क विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर दुबईहून आलेल्या स्पाईसजेटच्या विमानातील सर्व प्रवाशांची कसून तपासणी करण्यात आली परंतु, त्यांच्याकडे काहीही संशयास्पद मिळाले नाही. त्यानंतर अधिकाऱ्यांनी विमानतळावर सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. प्रवासी विमानातून पहिल्या मजल्यावर उतरुन तेथून खाली तपासणीसाठी येतात. तेव्हा तेथील पहिल्या मजल्यावर पुरुषांच्या स्वच्छतागृहात तपासणी केली. त्यावेळी तेथील कचरा पेटीत (डस्टबीन)मध्ये मोबाईलच्या चार मोठ्या कव्हरमध्ये ही 86 सोन्याची बिस्कीटे त्यांना आढळली. तसेच त्याचबरोबर 2 सोन्याची वेढणीही त्यात होती. या बिस्किटांचे वजन 10175 किलो असून त्याची किंमत 3 कोटी 9 लाख, 34 हजार 675 रुपये इतकी आहे
सीमा शुल्क विभागाने यापूर्वी 7 किलोपर्यंतचे तस्करी करुन आणलेले सोने पकडले होते. मात्र त्यानंतर आता तीन कोटी रुपयांचे सोने पकडण्यात आले असून ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. तसेच महसुल गुप्तवार्ता संचलनालयाचे प्रादेशिक विभाग सुरु करण्यात आल्यापासून ही पहिली मोठी कारवाई आहे. असे कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)