दुबईस्थित दोन कंपन्यांच्या संचालिकेला ईडीकडून अटक

व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंगचे प्रकरण

नवी दिल्ली -दुबईस्थित दोन कंपन्यांच्या संचालिका शिवानी सक्‍सेना यांना आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंगच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली.

यूएचवाय सक्‍सेना आणि मॅट्रिक्‍स होल्डिंग्ज या कंपन्यांच्या शिवानी संचालिका आहेत. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग ऍक्‍टच्या (पीएमएलए) अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची रवानगी चार दिवसांसाठी तुरूंगात केली.

व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या वापरासाठी 12 हेलिकॉप्टर घेण्याचा करार केंद्र सरकारने फिनमेक्कानिका कंपनीची ब्रिटीश उपशाखा असणाऱ्या ऑगस्टावेस्टलॅंडशी केला. तब्बल 3 हजार 600 कोटी रूपयांच्या या व्यवहाराचे कंत्राट मिळवण्यासाठी 423 कोटी रूपयांची लाच देण्यात आल्याचा आरोप झाला. या घोटाळ्यात मनी लॉण्डरिंगचा आरोपपही पुढे आला. त्यावरून ईडीने 2014 मध्ये भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख एस.पी.त्यागी यांच्यासह 21 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या मनी लॉण्डरिंगमध्ये शिवानी सक्‍सेना याही सामील असल्याचा संशय आहे. दरम्यान, लाचखोरीचा आरोप पुढे आल्यानंतर तत्कालीन यूपीए सरकारने 1 जानेवारी 2014 ला हेलिकॉप्टर खरेदी करार रद्द केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)