विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोने यांचा आदेश 


पीडित गर्भवती राहिल्याने उघडकीस आला प्रकार

पुणे- दुबईला फिरायला नेण्याचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोने यांनी हा आदेश दिला आहे.
दशरथ शंकर राठोड (वय 19, रा. शिवणे) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. वारजे माळवाडी भागात राहणाऱ्या 14 वर्षीय पीडित मुलीच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये हा प्रकार घडला. दशरथ याने पीडित मुलीशी ओळख निर्माण केली. त्यानंतर लग्न करणार आहे. दुबई येथे फिरायलाही नेणार असल्याचे सांगून न्यु अहिरेगाव येथील मित्राच्या खोलीत नेवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती राहिली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार वारजे माळवाडी पोलिसांनी या प्रकरणात दशरथ याला अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. तो मूळचा कर्नाटकातील आहे. फरार होण्याची, फिर्यादी आणि पीडित मुलीवर दबाव आणण्याची अथवा पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्‍यता आहे. यासाठी त्याचा जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद ऍड. पाठक यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने दशरथ याचा जामीन फेटाळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)