दुबईत “मॅच फिक्‍सिंग’चे वादळ; अफगाण खेळाडूची तक्रार

दुबई: नव्वदीच्या दशकात गाजलेल्या फिक्‍सींग प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्‍व पूर्णपणे हादरून गेलं होतं. भारतासह अनेक देशांचे खेळाडू हे बुकींच्या संपर्कात आलेले होते. यानंतर आयसीसी व संबंधित देशांच्या क्रिकेट संस्थांनी फिक्‍सींगविरोधात कडक भूमिका घेत बुकींविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली.

अफगाणिस्तान संघाचा विकेटकिपर आणि सलामीचा फलंदाज मोहम्मद शहजादने ऑक्‍टोबरमध्ये शारजात होणाऱ्या अफगाण प्रिमिअर लीगमध्ये खराब प्रदर्शन करण्यासाठी बुकीकडून संपर्क साधण्या आल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी त्याने आसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी विभागात तक्रार दिल्याचे वृत्त एका क्रीडा वृत्त देणाऱ्या साईटने दिले आहे. शहजादने आशिया कप सुरु असतानाच संपर्क साधल्याचे सांगितले. दरम्यान, आसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाचे प्रमुख लेक्‍स मार्शल यांनी याची गांभिर्याने दखल घेणार असल्याचे सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)