दुबईत गायक मिका सिंगचे गैरर्वतन 

बॉलीवूडमधील प्रसिध्द गायक मिका सिंग याला गैरर्वतवणूक केल्याप्रकरणी दुबई पोलिसांनी अटक व सुटका केली आहे. त्याच्यावर एका 17 वर्षीय ब्राझिलिअन मॉडेलचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिका सिंगने आपल्याला अश्‍लील फोटो पाठवल्याचा आरोप तिने केला आहे.

दरम्यान भारतीय दुतावासाच्या हस्तक्षेपानंतर लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपाखाली अटक झालेला गायक मिका सिंगची सुटका करण्यात आली आहे. मिका सिंगची तुरुंगातून सुटका झाली असून आज (शुक्रवारी) त्याला न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती संयुक्त अरब अमिरातीमधील भारताचे उच्चायुक्त नवदीपसिंग सुरी यांनी दिली.

-Ads-

मिका सिंगवर ब्राझीलच्या 17 वर्षांच्या मॉडेलने लैंगिक छळाचा आरोप केला होता. दुबईमधील मुराक्कबात पोलीस ठाण्यामध्ये मिकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. बुधवारी मध्यरात्री 3 वाजता त्याला दुबई येथून ताब्यात घेण्यात आले. मिका दुबईला बॉलिवूडच्या “मसाला ऍवॉर्ड’ या पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्ससाठी गेला होता. मिका सिंगला दुबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मिकाने भारतीय दुतावासाकडे मदत मागितली होती. शेवटी भारतीय दुतावासाने या प्रकरणात हस्तक्षेप केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)