दुबईतील नृत्य स्पर्धेत “र्व्हसिटी ग्रुप’ला रौप्य पदक

पिंपरी – दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या “इंडियाज इंटरनॅशनल ग्रुव्हफेस्ट’मध्ये पिंपरी-चिंचवडसह पुणे, नगर, दौंड येथील महिलांचा सहभाग असलेल्या र्व्हसिटी डान्स ग्रुपने रौप्य पदक पटकाविले.

हार्टलॅंड इंटरनॅशनल स्कूलमध्ये या स्पर्धा पार पडल्या. मेघा संपत यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. भारतभरातील शंभर संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता. ज्येष्ठ अभिनेत्री सुधा चंद्रन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मेसव्हीन लुव्हीस, वृषाली चव्हाण यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. शुभांगी गोळे, सपना छाजेड, दिपाली पांढरे, शहनाज खान, शुभांगी बडवे, क्रांती कुलगुड, ऍड. शोभा कदम, स्मिता लोढा, पुर्वा शहा, संगीता तरडे, सोनिया पाटील यांचा या ग्रुपमध्ये समावेश होता. रवी ढगे व सचिन चव्हाण यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

विशेष म्हणजे महिलांनी एकत्र येवून काही तरी वेगळे करण्याच्या उद्देशाने या डान्स र्व्हसिटी ग्रुपची सुरूवात करण्यात आली. नृत्य, गायन, कविता रचणे अशा आयुष्यात राहून गेलेल्या कला, छंद जोपासणे हा या ग्रुपचा हेतू आहे. दुबईतील स्पर्धेची माहिती मिळताच 40 वर्षापुढील 11 सखींनी एकत्र येत नृत्याच्या माध्यमातून महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविण्याचे ठरविले. त्यामध्ये क्‍लासिक ग्रुपमध्ये मुक्‍त शैली प्रकारात नृत्य सादर करुन रौप्य पदक पटकाविले. प्रिती चढ्ढा यांनी संयोजन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)