दुधीवरे खिंड धोकादायक

येळसे, (वार्ताहर) – दुधीवरे खिंडीत पावसामुळे दरडी कोसळण्याचे प्रकारामुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पवना नगर परिसरात पडत असलेल्या पावसामुळे खिंडीतील भेगांमध्ये पाणी जाऊन दगड, माती, राडारोडा रस्त्यावर पडला आहे. त्यामुळे येथून प्रवास करणे धोक्‍याचे आहे. तसेच अनेक दिवसांपासून पडलेले दगड व राडारोडा रस्त्याच्या कडेला तसाच पडला आहे. रस्ता अरूंद असल्याने अनेकदा छोटे-मोठे अपघातही होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)