दुधिवरे खिंड धोकादायक !

  • समस्या : वाहनचालकांचा जीव मुठीत धरून प्रवास

येळसे,  (वार्ताहर) – लोणावळा मार्गावरील दुधिवरे खिंड धोकादायक झाल्याने या ठिकाणाहून जाताना जीव मुठीत धरुन जावे लागत आहे. खिंडीत दगड कोसळत असल्याने तातडीने सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मावळ तालुक्‍यातील पवनानगर, लोणावळा ही पर्यटनाची प्रमुख केंद्र असल्याने या ठिकाणी राज्य-परराज्यांतून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. पवनानगर-लोणावळा हा प्रवास दुधिवरे खिंडीमधून गेल्यास कमी वेळात अंतर कापता येते त्यामुळे खिंडीचा वापर जा-ये करण्यासाठी होत असतो. नुकत्याच झालेल्या पाऊसामुळे खिंडीत दगड कोसळले आहेत. पाऊसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्‍त केली जात आहे.

लोणावळा, पवनमावळ परिसरातील किल्ले, लेण्याद्री, धार्मिक स्थळे असल्याने पर्यटक व भाविकांचा ओढा असतो; मात्र दुधिवरे खिंडीतून जोखमीचा प्रवास करताना ते नाराजी प्रकट करतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खिंड सुरक्षित करण्याची मागणी संत तुकाराम सहकारी सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग ठाकर, भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस गणेश ठाकर, शिवसेनेचे अमित कंभार, महादुबुवा कालेकर, बाळासाहेब जाधव, संदीप भुताडा, साईनाथ केदारी, ऍड. भरत ठाकर प्रतिष्ठाण, बजरंग दल, पवनमावळ यांच्यासह आदींनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)