दुधाचे दर गडगडले, शेतकरी अडचणीत

File Photo

भुईंज – सातारा जिल्ह्यातील दुध उप्तादक शेतकऱ्यांना एक डिसेंबर पासून शासनाने जाहीर केलेल्या 25 रुपये प्रतीलिटर ऐवजी 18 रुपये प्रती लिटर प्रमाणे दुधाला दर देणार असल्याचे सातारा जिल्हा दुध व्यावसायिक कृती समीतीने प्रत्येक दुध संकलन केंद्रांना दर पत्रक पाठवून कळवल्याने दुध उप्तादक शेतकऱ्यांना आता प्रती लिटर 7 रुपयांचा तोटा होणार असल्याने संतापाची लाट उसळली आहे.

सविस्तावृत्त असे की, शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी दुधाला किफायतशीर किमान 25 रुपये प्रती लिटर दर शासनाने द्यावा, या रास्त मागणीसाठी राज्यातील दुध उप्तादक शेतकऱ्यांना संघटीत करुन राज्यात चक्का जाम आंदोलन उभे केले होते. या आंदोलनाला मोठे यश येऊन राज्य शासनाने 22 रुपये प्रती लिटर दर जाहिर करुन 3 रुपये प्रती लिटर दुध संघांना अनुदान जाहिर करुन एकूण 25 रुपये दर देणार असल्याचे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते.

गेली तीन महिने दुध उत्पादकांना 25 रुपये प्रती लिटर दरही मिळत होता. पण दुध संघांना तिन रुपये प्रतिलिटर जाहीर केलेले अनुदान शासनाने आज पर्यंत दिले नसल्याने संघ कित्येक कोटी रुपयात बुडाल्याने ते अडचणीत सापडल्याने त्यांनी थेट जिल्ह्यातील दुध संकलन केंद्रांना नवीन दर पत्रक तयार करुन 25 रुपयांवरुन 18 रुपये दर देणार असल्याचे जाहीर केल्याने प्रती लिटर 7 रुपयांचा तोटा उत्पादकांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे

एका बाजुला शासन सांगते की शेतीला जोड धंदा म्हणून शेतकऱ्यांनी दुध व्यवसायाकडे वळल्यास त्यांना विविध प्रकारचे अनुदान शासनामार्फत देण्यात येईल. पण ग्रामीण भागातील पिढ्यान्‌पिढ्या शेतकऱ्यांचा हा सुरु असलेला दुधांचा धंदा राज्य सरकारच्या खोट्या घोषणांनी आज अडचणीत सापडल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण कोसळल्याशिवाय राहणार नाही.

दररोजच्या दुधाच्या पैशांवर मुलांचे शिक्षण आणि घरखर्च चालविण्यासाठी कुटुंबांना मोठी मदत होत होती. पण आज कवडी मोल दराने दुध संकलन केंद्रांना दुध घालण्याचे संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे. दिवसेंदिवस जनावरांचे खाद्य आणि वैरणींचे दर गगणाला भिडल्याने जनावरे कशी जगवायची असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)