दुटप्पीपणा सोडून 26/11 घडवणाऱ्यांना तातडीने शिक्षा करा

भारताने पाकिस्तानला ठणकावले

नवी दिल्ली – मुंबईतील महाभयंकर दहशतवादी हल्ल्यांवरून (26/11) भारताने कडक शब्दांत पाकिस्तानला ठणकावले आहे. पाकिस्तानने दुटप्पीपणा सोडून ते हल्ले घडवणाऱ्यांना तातडीने शिक्षा करावी, असे भारताने म्हटले आहे. 
सोमवारी 26/11 ला दहा वर्षे पूर्ण झाली. त्यापार्श्‍वभूमीवर, परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला सुनावताना त्या हल्ल्यांत सामील असणाऱ्यांना शिक्षा करण्याबाबत तो देश प्रामाणिक नसल्याचे सूचित केले. तसेच, हल्ल्यांचे सूत्रधार मोकाटपणे पाकिस्तानात फिरत असल्याचेही निदर्शनास आणून दिले.

हल्ल्यांत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटूंबीयांप्रती उत्तरादित्व दाखवताना पाकिस्तानने दोषींना शिक्षा करावी. तसेच, त्या कृतीद्वारे आंतरराष्ट्रीय कर्तव्याचेही पालन करावे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. पाकिस्तानी भूमीत 26/11 चा कट शिजला. तिथूनच तो अंमलात आणला गेला. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भूमीतून दहशतवादी पाठवले गेल्याची कबुली दिली, याकडेही परराष्ट्र मंत्रालयाने लक्ष वेधले.

-Ads-

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घडवलेल्या 26/11 हल्ल्यांत 166 जण मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये 14 देशांचे नागरिक असणाऱ्या 28 परदेशींचाही समावेश होता. ते हल्ले पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने घडवल्याचे स्पष्ट झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)