दुचाकी विक्रीत फसवणुकीचे मुंबई ‘कनेक्शन’

दुचाकी विक्रीच्या बहाणा; मुंबईत दोघे जेरबंद

पुणे – ओएलएक्‍स वेबसाईटवर ऑनलाईन दुचाकी विकण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सायबर क्राईम सेलच्या पथकाने सापळा रचून अटक केली. ठाणे आणि मुंबईतील जोगेश्‍वरी वेस्ट येथे ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून चार मोबाईल, एक डोंगल आणि विविध बॅंकेची 13 डेबिट कार्डे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासात त्यांनी अशा पध्दतीने आतापर्यंत राज्यभरातील तीस लोकांना गंडा घातला आहे.

साजीद मोहम्मद शेख (वय 37, रा. फ्लॅट नं. 8, ए/405, पाटलीपुत्र कॉलनी, जोगेश्‍वरी वेस्ट, मुंबई) आणि नासीर अब्बास शेख (वय 40, रा. रुम नं. 302, तिसरा मजला, मदिना मंजिल, मुब्रा, ठाणे), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; यातील फिर्यादींना स्कुटी गाडी घ्यायची होती. ते इंटरनेटवर सर्फिंग करत असताना खरेदी- विक्री करणाऱ्या ‘ओएलएक्‍स’ या वेबसाईटवर त्यांना या गाडीची जाहिरात दिसली. त्यानुसार त्यांनी साजीद आणि नासीर यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी या दोघांनी अठरा हजार रुपये दिल्यानंतर गाडी ताब्यात देण्यात येईल, असे त्यांना सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेऊन या फिर्यांदीनी साजीद आणि नासीर यांना अठरा हजार रुपये दिले. मात्र; या दोघांनी त्यांना ठराविक कालावधीत दुचाकी दिली नाही, त्यामुळे त्यांनी या दोघांच्या विरोधात खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खडक पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा तपास करत असताना हे दोघे जोगेश्‍वरी वेस्ट आणि ठाणे येथे राहात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती, त्यानुसार सायबर सेलच्या पथकाने याठिकाणी सापळा रचून साजीद आणि नासीर यांना अटक केली. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासात आतापर्यंत राज्यभरातील तीस गरजूंना अशा पध्दतीने गंडा घातल्याची कबुली साजीद आणि नासीर यांनी दिली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्‍त निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे, पोलीस कर्मचारी किरण अब्दागिरे, नवनाथ जाधव, अमित औचरे, शीतल वानखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)