दुचाकी पादचारीच्या धडकेत एकाचा मृत्यू

घारगाव, दि. 18 (वार्ताहर) – पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्‍यातील कर्जुले पठार येथे गुरुदत्त मंगल कार्यालयासमोर रात्री साडेनऊच्या दरम्यान संगमनेरकडून मोटारसायकलवरून कौठे बुद्रुककडे येत असताना दोन पादचाऱ्यांना दुचाकीने उडवले असता मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत माहिती अशी, संगमनेरकडून कौठे येथे येत असताना मोटारसायकल चालक डॉ. राजेंद्र वाळुंज यांनी दोन पादचाऱ्यांना उडवले असता दुचाकीस्वार यांचा जागीच मृत्यू झाला असून पादचारी राजेंद्र क्षीरसागर व त्यांचे भाचेजावई दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत घारगाव पोलीस ठाण्याचे दिलीप निघोट यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)