दुचाकी दगडी ब्लॉकला धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

पुणे : दुचाकी ब्लॉकला धडकून एकाचा मृत्यू झाला. ही घटना कात्रज नवीन बोगदा ते दरीपूलादरम्यान गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी हिराजी लिमण (रा. पारवाडी, ता.भोर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हे त्यांच्या दुचाकीवरुन कात्रज नवीन बोगद्यातून दरीपुलाकडे वेगात जात होते. यावेळी दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी दगडी ब्लॉकला धडकली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. पी. यादव तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)