“दुचाकी ढकल मोर्चा’ काढत कॉंग्रेसचे आंदोलन

– इंधन दरवाढ आणि विविध धोरणांचा निषेध

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.23 – पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेससह विविध संघटनांनी आंदोलन करुन केंद्र सरकारचा निषेध केला. कॉंग्रेसने तर “दुचाकी ढकल मोर्चा’ काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
देशभरातून सध्या इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्‍वभूमीवर बुधवारी कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली संत कबीर चौक ते अल्पना टॉकीज चौकापर्यंत दुचाकी ढकल मोर्चा काढण्यात आला. यात मोदी सरकारच्या निषेधाचे फलक घेवून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी दुचाकी वाहने ढकलत नेली.

राज्यात इंधनावर अनेक कर लावले जात आहेत हे कर कमी केले पाहिजेत. आता पेट्रोलचे भाव 84 रुपयांपर्यत पोहचले आहेत. या दरवाढीमुळे जीवनाश्‍यक वस्तूंवर सुद्धा परिणाम होणार आहे, असे रमेश बागवे म्हणाले. यावेळी आमदार बाळासाहेब शिवरकर आणि मोहन जोशी यांची भाषणे झाली. त्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी कॉंग्रेसचे नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“पेट्रोलसाठी कर्ज वाटप आंदोलन’
इंधन दरवाढीचा निषेध करत ग्राहक हक्क संघर्ष समितीने जंगली महाराज रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर निदर्शने करण्यात आली. “पेट्रोलसाठी कर्ज वाटप’ आंदोलन केले. यावेळी पंपावर येणाऱ्या वाहन चालकांना कर्ज पुरवठ्याचे अर्ज वाटण्यात आले. या आंदोलनात समितीचे अध्यक्ष आनंद राजहंस, उपाध्यक्ष सतीश कांबळे आदी उपस्थित होते. तर येत्या आठ दिवसांत पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घेतली नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा हमारी अपनी पार्टीने दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)