दुचाकी टेम्पोला धडकून दोघांचा मृत्यू

उरुळी कांचन- पुणे- सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथील म्हसोबा मंदिराजवळ एका दुचाकी वाहनाने टेम्पोला धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोणी काळभोरवरून सोरतापवाडी येथे एक टेम्पो जात होता. यावेळी पुण्याहून सोलापूरकडे एका दुचाकीवरून भैरवनाथ बालजी साळुंखे (वय 21) व दत्ता महादेव टेकाळे (वय 21, दोघे रा. मु. पो. वाटवडे, ता. कळंब, जि. सोलापूर) हे पाठीमागून वेगाने येत होते. पुढे असणाऱ्या टेम्पोला पाठीमागून
धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे तरूण विरूध्द दिशेला जाऊन पडले. यावेळी यवतवरून हडपसरकडे जाणाऱ्या चार चाकी वाहनांने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या जखमी सहकाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)