दुचाकी-टेम्पोच्या अपघातात दोघांचा मृत्यू

अणे- येथे अणे घाटात रविवार (दि. 6) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास, दुचाकी व टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात, एकूण दोनजण जागेवरच ठार झाले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अणे गावच्या हद्दीत कल्याण-नगर महामार्गावरून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अणे घाटातून दुचाकी (एमएच 14 डीइ 6854) ही अणे बाजूकडून बेल्हे बाजूकडे येत होती, तर टेम्पो बेल्ह्याकडून अणेकडे जात होता. यावेळी दुचाकी आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन जण जागेवरच ठार झाले. दरम्यान अपघातात ठार झालेल्यापैकी एक जण नितीन बांगर (वय 39, रा.बांगरवाडी, ता.जुन्नर), तर दुसरा महेंद्र शेटे (वय 25, रा. पिंपळवंडी ता. जुन्नर) येथील राहणारे आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)