दुचाकी चोराला सक्‍त मजुरी

पिंपरी – दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात एका तरुणाला पिंपरी न्यायालयाने अकरा महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.

विलास मारुती कोळी (वय-24, रा. यमुनानगर, निगडी) असे शिक्षा सुनावलेल्या तरुणाचे नाव आहे. न्यायाधीश एस. जी. अगरवाल यांनी ही शिक्षा ठोठावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निगडी परिसरातील दत्तवाडी आणि मधुकर पवळे उड्‌डाणपूल येथून दोन वाहने चोरीला गेल्याची नोंद निगडी पोलीस ठाण्यात होती. निगडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक निरीक्षक देवेंद्र चव्हाण व त्यांच्या पथकाने त्या गुन्ह्यातील कोळी याला घरकुल परिसरातून मार्च महिन्यात अटक केली होती. त्याच्याकडून दोन वाहने जप्त करण्यात आली होती. त्या गुन्ह्याचा खटला पिंपरी न्यायाधीश अगरवाल यांच्या समक्ष सुरु होता. सहायक सरकारी अभियोक्ता भूषण पाटील यांनी चार साक्षीदार तपासले. पोलीस कर्मचारी केशव शेळके यांनी त्यांना सहकार्य केले. पंच तसेच, तपासी अधिकाऱ्यांची साक्ष ग्राह्य धरुन त्याला अकरा महिन्यांची कैद न्यायालयाने सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)