दुचाकी चोरट्यांची येरवडा कारागृहात रवानगी

आळंदी- आळंदीतील चाकण चौकातून तीन वर्षांपूर्वी चोरी गेलेल्या दुचाकीसह दोघा चोरट्यांना आळंदी पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. तर खेड न्यायालयाच्या आदेशने त्यांची आज (मंगळावारी) येरवडा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले असल्यची माहिती आळंदी पोलीस ठाण्यातील जामदार महेश साळुंके यांनी दिली.
नदिम अस्लम शेख (वय 20), अक्षय शाम शिंदे (वय 21, दोघे रा. वाकी खुर्द, ता. खेड) असे कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी महापालिका हद्दीतील पिंपळे गुरव येथे राहणारे भिमराव अंबादास अठोर यांची दुचाकी (एमएच 14, बिवाय 2548) आळंदीतील चाकण चौकातून डिसेंबर 2014मध्ये चोरी गेल्याची फिर्याद दिली होती. दरम्याम, तपासणी करीत असताना पाच दिवसांपूर्वी या दोघांना अटक केली होती. दरम्यान, खेड न्यायालयाने सुरूवातील चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तर आज येरवडा कारागृहात रवानगीचा आदेश दिल्याचे साळूंके यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)