दुचाकीस जीपची धडक; दोन युवकांचा मृत्यू

  • हनुमानवाडी गावाच्या हद्दीतील घटना

आळंदी  – येथील चाकण-आळंदी रस्त्यावरील हनुमानवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत (दि. 19) भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरो जीपने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दोन युवकांचा मृत्यू झाला.
हा अपघात शुक्रवारी (दि. 19) रात्री पाऊणे आठच्या सुमारास झाला. या अपघातात नागेश दयानंद शेट्टी (वय 20), तुषार एकनाथ माने (वय 24, दोघे रा. आळंदी, चाकण चौक) असे मृत्युमुखी झालेल्या दोघांचे नाव आहे.
आळंदी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाकण बाजूकडून आळंदीकडे भरधाव वेगाने येणारी बोलेरो जीप (एमएच 15 सीएम 6317) वरील चालकाने दुचाकी (एमएच 12 जीई 6669) वरील दोन युवकांना जोरदार धडक देऊन जखमी केले. दोघांना खासगी रुग्णालयात उपचारास केले होते. त्यापैकी नागेश शेट्टी याचा शुक्रवारी (दि. 19)तर तुषार माने याचा शनिवारी (दि. 20) रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघाताची खबर न देता बोलेरो चालक निघून गेला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)