दुचाकीस्वाराला मारहाण करुन तेरा हजार पळवले

पिंपरी, (प्रतिनिधी) – दुचाकीस्वाराला कार आडवी घालून सहा जणांच्या टोळक्‍यांनी मारहाण करत तेरा हजार रुपये लुटून नेले.. ही घटना वाकड-हिंजवडी रोडवर सोमवारी (दि.19) दुपारी तीन ते सायंकाळी साडे चारदरम्यान घडली.
कुणाल जेऊघाले (वय 22, रा.निगडी प्राधिकरण) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कार क्र. (एमएच/12/एचएल/8832 )मधून आलेल्या अज्ञात सहा जणांविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल हा सोमवारी (दि.19) ला आपल्या दुचाकीवरुन दुपारी चारच्या वाकड हिंजवडी लिंक रस्त्यावरुन जात होता. यावेळी या कारमधून आलेल्या अज्ञात सहा जणांनी त्यांची कार कुणालच्या दुचाकीच्या आडवी लावली. तसेच आमच्या कारची झालेली नुकसान भरपाई दे, असे सांगून त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून मारहाण केली. त्यानंतर त्याला कार मधून मंगलनगर थेरगाव येथील एचडीएफसी बॅंकेच्या एटीएमवर आणून त्याला जबरदस्तीने तेरा हजार रुपये कढायला भाग पाडले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी कुणालची दुचाकी, लॅपटॉप बॅग व मोबाईल फोन परत केला.

तसेच याबद्दल कोणालाही काही सांगितल्यास बघून घेऊ अशी धमकी देऊन तेथून पसार झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)