दुचाकीच्या धडकेत महिला जखमी

पिंपरी – जुनी सांगवी येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने 32 वर्षीय महिलेला धडक दिली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून सांगवी पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अन्नपूर्णा बाळासाहेब गोडसे (वय-55, रा. शितोळे नगर, जुनी सांगवी) असे जखमी महिलेचे नाव आहे. प्रतिभा देवानंद भोळे (वय-32, रा. मदने चाळ, शितोळे नगर, जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे.

अन्नपूर्णा त्यांच्या मैत्रिणींसोबत सांगवी चौपाटीकडून मुख्य रस्त्याच्या बाजूला फडतरे वॉशिंग सेंटर जवळ रस्त्यावर गप्पा मारत उभारल्या होत्या. त्यावेळी एक ऍक्‍टिवा (एमएच 14, जीजी 1620) भरधाव वेगात आली आणि अन्नपूर्णा यांना धडक दिली. यामध्ये अन्नपूर्णा यांच्या डोक्‍याला मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)