दुचाकीच्या डिकीतून 40 हजार लंपास

सातारा,दि.3 (प्रतिनिधी)
सातारा शहरापासून जवळच महामार्गावर एका हॉटेलच्या पार्कींगमधील दुचाकीच्या डिकीतून चोरट्यांनी 40000 रुपये लांबवले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बाळू किसन निकम यांनी फिर्याद दिली आहे.निकम यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी सातारा शहरातील एका बॅंकेतून 40 हजार काढले होते. त्यानंतर ते त्यांच्या मुळ गावी अपशिंगे येथे निघाले होते. ते खिंडवाडी येथील महामार्गावरील एका हॉटेलला थांबले होते. त्यावेळी पार्कींगमध्ये लावलेल्या त्यांच्या दुचाकीच्या डिकीचे लॉक तोडत अज्ञाताने रोख रक्कम 40 हजार व 4 हजार रुपये किमंतीचा मोबाईल लंपास केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)