दुचाकीच्या डिकीतील वीस हजार लांबवले

कोपरगाव – शहरातील स्टेट बॅंकेच्या शाखेसमोरील एका मोटारसायकलच्या डिकीतील वीस हजार रुपयांवर अज्ञात चोरटयाने डल्ला मारला आहे.
गणपत पुंजाजी गुंड (वय 68, रा. देर्डे-चांदवड) यांनी सोमवारी दुपारी बारा ते सव्वाबारा वाजण्याच्या दरम्यान स्टेट बॅंकेतून वीस हजार रुपये काढले. ही रक्कम त्यांनी दुचाकी (क्रमांक एमएच 17 एम 3206) च्या डिकीमध्ये ठेवली. काही क्षणांत अज्ञात चोरटयाने डिकीतील 20 हजार रुपये व पासबुक लंपास केले. चोरी झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात येताच त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखली डी.एस. लोंढे हे अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)