दुचाकीची लिप्ट जीवावर बेतली

पारगावजवळ अपघातात एकाचा मृत्यू

पारगाव शिंगवे- आंबेगाव तालुक्‍यातील पारगाव येथे शुक्रवारी (दि.9) रात्री ट्रॅक्‍टर व मोटारसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील बबन गणपत होळकर (वय 62, रा. काठापुर खुर्द, ता. शिरुर) यांचा जागीच मृत्यू झाला तर मोटारसायकलचालक योगेश गुलाबराव बऱ्हाटे (रा. भागडी ता.आंबेगाव) हे जखमी झाले. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री पावणेसात वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल होन्डा पॅशन (क्रमांक. एमएच- 14 बी. क्‍यू. 4190) वरून योगेश गुलाबराव बऱ्हाटे पारगाववरून भागडीकडे चालले होते. पारगाव शिंगवे रस्त्यावरील घोडनदी पुलाच्या अलीकडे बबन गणपत होळकर यांनी लिफ्ट मागितली. त्यानंतर ते मागे बसले होते. पुलाच्या शिंगवेकडील बाजूने ऊसाने भरलेली ट्रॉल्या घेऊन येणाऱ्या ट्रॅक्‍टर व मोटारसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात बबन गणपत होळकर यांचा जागीच मृत्यु झाला तर योगेश गुलाबराव बऱ्हाटे हे जखमी झाले. मंचर पोलिसांनी अज्ञात ट्रॅक्‍टरचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)