दुचाकवीस्वारावर चाकुने वार करुन लूटले

दुचाकिस्वाराव चाकूने वार करुन सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेण्यात आली. याप्रकरणी रिक्षा चालक, दोन महिला व त्यांच्या चार साथीदारांविरुध्द फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी पासोड्या विठोबा जवळ घडली.
फिर्यादी काशिनाथ खजुरकर(25,रा.भोसरी) हे त्यांचा मित्र शरणप्पा महादेव हराळ्या याच्यासह दुचाकीवरुन चालले होते. यावेळी एका अनोळखी रिक्षा चालकाने जवळ येऊन त्यांना थांबवले. यानंतर फोनवरुन त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावून घेतले. दोन महिला आणी चार पुरुष तेथे आले. यानंतर रिक्षा चालकाने फिर्यादी व शरणप्पा यांना चाकूचा धाक दाखवला. फिर्यादीच्या खिशातील 7,150 रुपयांची रोकड काढून घेण्यात आली. यानंतर शरणप्पा त्यांना विरोध करुन लागताच त्याला चाकु खूपसून गंभीर जखमी केले. तसेच शरणप्पाच्या गळ्यातील 35 हजार रुपयांची सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेण्यात आली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)