दुग्धविकासात राज्य स्वयंपूर्णतेसाठी प्रयत्न : ना. महादेव जानकार

शिर्डी – शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणात पशुसंवर्धन व दूग्धव्यवसाय विभागाच्या योजना सहायक ठरणाऱ्या आहेत. शेतकऱ्यांनी शेतीसह पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय या पुरक उद्योगांकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. राज्याचा आर्थिक विकास दर वाढवण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्धविकासामध्ये राज्य स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी आज येथे केले.

पुणतांबा येथील एका खासगी कार्यक्रमाप्रसंगी दुग्धविकास मंत्री जानकर बोलत होते. यावेळी आ. स्नेहलता कोल्हे, आ. भाऊसाहेब कांबळे, माजी मंत्री अणासाहेब म्हस्के, मा. आ. अशोक काळे, सरपंच धनंजय धनवटे, युवा नेते आशुतोष काळे, सुभाष कुलकर्णी, धनंजय जाधव आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुग्धविकास मंत्री जानकर म्हणाले की, पशुसंवर्धन व दुग्धविकास शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारे व्यवसाय आहेत. राज्य सरकारकडून या व्यवसायासाठी आवश्‍यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. राज्याला सद्यस्थितीत इतर राज्यातून मत्स्यबीज, अंडी तसेच दुधाची आयात करावी लागते, मात्र मत्स्यबीज, अंडी तसेच दुधाचे उत्पादन वाढवून राज्याला स्वंयपूर्ण करू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)