दु:खाने भरलेल्या जगात मानवाला विनोदाची देणगी

ना.शेखर चरेगावकर यांना यशवंतराव चव्हाण सहकार भूषण पुरस्काराचे वितरण करताना श्रीमंत कोकाटे. समवेत इतर मान्यवर.

सुभाष खुटवड : फलटणमध्ये यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन उत्साहात

कोळकी, दि. 27 (वार्ताहर) – दुःखाने भरलेल्या या जगात मानवाला मिळालेल्या विनोदाच्या देणगीमुळे तो जगत असतो. आपल्या दुःखाकडे गांभीर्याने पाहिले तर ती वाढतात आणि हसतहसत पाहिले तर ती कमी होतात. म्हणून आयुष्यात विनोदाचं अतिशय महत्वाचं स्थान आहे. कोणत्याही दुःखावर, संकटावर, अडचणींवर विनोद हे रामबाण औषध आहे, असे मत ज्येष्ठ विनोदी लेखक व वक्ते सुभाष खुटवड यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राचे शिल्पकार तसेच श्रेष्ठ साहित्यिक, यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन येथील महाराजा मंगल कार्यालयात पार पडले. प्रख्यात विनोदी साहित्यिक पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हे संमेलन विनोद विषयाला वाहिलेले होते. अध्यक्षस्थानी खुटवड होते. ना. शेखर चरेगावकर, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, ज्ञानदीपचेसंस्थापक अध्यक्ष विश्‍वनाथ पवार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (सासवड) स्वागताध्यक्ष विजय कोलते, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, संमेलनाचे स्वागताध्यक्ष व सद्‌गुरू उद्योग समुहाचे सर्वेसर्वा दिलीपसिंह भोसले, मसापचे सातारा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ, नगरसेवक सचिन बेडके, यशवंतराव चव्हाण स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ताजीराव बेडके, हास्यकवि बंडा जोशी, राहुल कुलकर्णी, मसाप फलटण शाखा अध्यक्ष प्राचार्य रविंद्र येवले यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्कार महाराष्ट्र ना.शेखर चरेगावकर यांना श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते तर यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्कार, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजेंद्र माने (सातारा) यांना सुभाष खुटवड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शेखर चरेगावकर, श्रीमंत कोकाटे, विजय कोलते, विश्‍वनाथ पवार, डॉ. राजेंद्र माने, यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)