दुकाने बंद ठेवल्यास परवाने रद्द करू

श्रीरामपूर – राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी 1 एप्रिलपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. दुकाने बंद ठेवल्यास परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा राज्य सरकारने दिल्याने दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने नुकताच मुंबईत विधानसभेवर मोर्चा काढला. अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्याबरोबर झालेली चर्चा अयशस्वी झाली. यामुळे संघटनेने 1 एप्रिलपासून बेमुदत स्वस्त धान्य दुकाने व रॉकेल विक्री केंद्रे मागण्या मान्य होईपर्यंत बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानदारांना इशारा दिला.
स्वस्त धान्य दुकानदारांनी 1 एप्रिलपासून दुकाने बंद ठेवणार असल्याचे घोषित केले आहे. परंतु, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळण्यास लाभार्थी हक्कदार असतील अशी तरतूद आहे. लाभार्थींना अन्नधान्यापासून वंचित ठेवल्यास त्या अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.
दुकानदारांनी अन्नधान्याची उचल न केल्यास अथवा दुकान बंद ठेवल्यास जीवनावश्‍यक वस्तू अधिनियमातील तरतुदीचा वापर करून परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी काढला.
राज्य सरकारच्या या आदेशाचा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, सचिव रज्जाक पठाण, शहराध्यक्ष माणिक जाधव, चंद्रकांत गायकवाड यांनी निषेध केला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दुकानदारांच्या प्रश्‍नांवर सकारात्मक भूमिका घ्यावी, याबाबतचे पत्रही देण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)