दुकाने बंदची सक्‍ती नको

मंचर- मराठा आरक्षणाबाबत क्रांती दिनी (दि. 9) राज्य बंदची हाक दिली आहे. यात आंबेगाव तालुका सहभागी होणार असून तालुका 100 टक्के बंद ठेवला जाणार आहे. दुकानदार स्वयंस्फुर्तीने दुकाने बंद ठेवणार आहेत, त्यामुळे कोणीही दुकाने बंद करा याची सक्ती केली जाणार नाही. यावेळी होणारे मोर्चे, ठिय्या आंदोलने शांतते पार पडणार आहे. मंचर, घोडेगाव येथे प्रभातफेरी काढुन ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे मंचर येथील बैठकीत ठरले आहे.
या बैठकीला विवेक वळसे पाटील, देवदत्त निकम, ऍड.सुनिल बांगर, विष्णु हिंगे, वसंत बाणखेले, अजय घुले, राजु इनामदार, राजाराम बाणखेले, अरूण गिरे, बाबासाहेब खालकर, प्रवीण मोरडे, अशोक काळे,प्रशांत काळे, सुरेश निघोट, गणपत इंदोरे, दत्ता थोरा, शरदर शिंदे, सचिन बांगर, बाजीराव महाराज बांगर, विनोद गायकवाड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. आंबेगाव तालुक्‍यातील शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये, व्यवसाय बंद ठेवुन बंदला शंभर टक्के प्रतिसाद द्यावा. तसेच दुकानदार स्वतःहून दुकाने बंद ठेवणार आहे. सरकारी कार्यालये बंद ठेवली जातील; परंतु सकल मराठा समाजाने सरकारी कार्यालये, दुकाने तसेच कोणालाही सक्‍तीने बंद ठेवण्यासाठी बळजबरी करू नये, असे आवाहन येथील बैठकीत मान्यवरांनी केले. तालुक्‍यातील सर्व गावे बंदमध्ये सहभागी होतील. कोणतीही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यावी. सकल मराठा समाजाकडे संयम आहे; परंतु पोलीस प्रशासनही कोणाच्या सांगण्यावरून किंवा चुकीच्या पद्धतीने कारवाईचा बडगा उचलु नये, अशी विनंती यावेळी मान्यवरांनी केली. मंचर आणि घोडेगाव शहरात तेथील कार्यकर्ते प्रभातफेरी काढून बंदमध्ये सहभागी होतील. तसेच त्यानंतर तेथील चौकात ठिय्या आंदोलन करून सरकारच्या विरोधात आपल्या भावना मांडणार आहे. पोलीस प्रशासनाने योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)