दुकानातून अॅप्पल मोबाईलची चोरी

पिंपरी – वाकड येथील क्रोमा स्टोअर्स मधून तब्बल ७९ हजार रुपयांचा अॅप्पल कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. ही घटना नुकतीच समोर आली.

याप्रकरणी रवींद्र कालिदास क्षीरसागर (वय-२९, रा. चिंतामणी कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

-Ads-

पोलिसांनी त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वाकड येथील क्रोमा स्टोअर्समध्ये मोबाईल पाहण्यासाठी काही ग्राहक आले होते. त्यामध्ये मोबाईल चोर देखील दुकानात आला. दुकानात येताना त्याने कुणाशी तरी फोनवर बोलत असल्याचे नाटक करुन तब्बल ७९ हजार रुपयांचा अॅप्पल कंपनीचा मोबाईल चोरुन नेला. दरम्यान चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली. वाकड पोलीस त्याआधारे चोराचा शोध घेत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
4 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
1 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)