दुकानदाराकडून मुलीचा विनयभंग

पिंपरी – चिकन आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा दुकानदाराने विनयभंग केला. ही घटना दिघी येथे गुरुवारी (दि. 10) सकाळी घडली.

रिझावल हक (वय-32, रा. साई पार्क रोड, दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 32 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी यांची 11 वर्षीय मुलगी चिकन आणण्यासाठी आरोपी रिझावल हक याच्या रजिया चिकन सेंटरमध्ये गेली. त्यावेळी त्याने तिचा विनयभंग केला. या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक कदम अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)