दुकानदारांना फसविणारा सराईत गुन्हेगार गजाआड

पिंपरी- पोलीस असल्याचे सांगून व्यावसायिकांकडून सोन्यासह आदी गोष्टी खरेदी करून त्यांना विविध बॅंकांचे तसेच दुसऱ्याच व्यक्तीचे बनावट धनादेश देवून फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगारास चिंचवड पोलीसांनी अटक केली.

तुकाराम शांताराम रौंधळ (वय 33, रा. रौंधळवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात 12 गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी सांगवीतील सराफी व्यावसायिक देवराज सोनी (वय 40, रा. पिंपळे-निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी यांचे सांगवी येथे व्हारायटी या नावाने सराफी पेढी आहे. आरोपीने पोलीस असल्याचे सांगून 33 हजार 784 रूपयांची सोन्याची चैन खरेदी केले. पैसे न देता पंजाब ऍण्ड सिंध बॅंकेचा बनावट धनादेश देवून आर्थिक फसवणूक केली. याच आरोपीने काळेवाडीत न्यू राज शिलाई मशीन दुकानातून नोव्हेल कंपनीची शिलाई मशीन खरेदी केली. रोख पैसे न देता आरोपीने बॅक ऑफ महाराष्टचा दुसऱ्या व्यक्तीचा धनादेश देवून साडेसात हजारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आली आहे. याप्रकरणी कन्हैया वर्मा (वय-25, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आरोपी तुकाराम रौंधळ हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे 12 गुन्हे दाखल आहेत. चिंचवड पोलीसांनी त्याला शनिवारी अटक करून मोरवाडी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने एक दिवसाची पोलील कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)