दुःख व्यक्त केलं, म्हणून राज्यकर्ते शेतकऱ्यांवर दाखल करत आहे गुन्हे -धनंजय मुंडे

मुंबई: चार साडे-चार वर्षांपासून सत्तेत असलेलं राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार हे शेतकरी विरोधी आहे. कांदा उत्पादक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी, फळबाग उत्पादक शेतकरी मेला तरी चालेल, पण हे सरकार काही त्यांना मदत करत नाही, असा संताप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

आज शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे राज्यातच नव्हे, तर दिल्लीतही आंदोलन करू लागला आहे आणि राज्यकर्ते शेतकऱ्यांनी दुःख व्यक्त केलं, म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत, हे दुर्दैवी असल्याचे मुंडे म्हणाले.

-Ads-

तसेच, हे सरकार २५ हजार कोटी बुलेट ट्रेनसाठी देते आहे. समृद्धी महामार्गासाठी ५५ हजार कोटी देते आहे. मग निळवंडे धरणासाठी साई संस्थानच्या तिजोरीतून पैसे का घेता, असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

आजपर्यंत जवळपास ७०० कोटींची मदत शिर्डी संस्थानने राज्य सरकारला केली आहे. जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त साधून देशाचे पंतप्रधान शिर्डीला आले होते, तेव्हा ३२०० कोटी शिर्डी संस्थानच्या विकासासाठी देणार होते. पण त्यातला एक रुपयाही शिर्डी संस्थानाला मिळाला नाही. एकीकडे संस्थानाला जाहीर केलेली मदत द्यायची नाही आणि दुसरीकडे त्याच संस्थानाच्या तिजोरीलर डल्ला मारायचा, असे काम हे राज्य सरकार करत आहे. हे सरकार तर देवालाही फसवण्याचं काम करतंय, असा घणाघात मुंडे यांनी केला आहे.

राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार हे शेतकरी विरोधी – धनंजय मुंडे

चार साडे-चार वर्षांपासून सत्तेत असलेलं राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार हे शेतकरी विरोधी आहे. कांदा उत्पादक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी, फळबाग उत्पादक शेतकरी मेला तरी चालेल, पण हे सरकार काही त्यांना मदत करत नाही, असा संताप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते Dhananjay Munde यांनी व्यक्त केला आहे. आज शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे राज्यातच नव्हे, तर दिल्लीतही आंदोलन करू लागला आहे आणि राज्यकर्ते शेतकऱ्यांनी दुःख व्यक्त केलं, म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत, हे दुर्दैवी असल्याचे मुंडे म्हणाले. #Farmers #governmentfailure

Posted by Nationalist Congress Party – NCP on Friday, 7 December 2018

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)