दीव शहरात दिवसा 100 टक्‍के सौरऊर्जा

नवी दिल्ली – दिवसा 100 टक्के नवीकरणीय ऊर्जेवर चालणारे देशातली पहिले स्मार्ट सिटी बनण्याचा मान दीवने पटकावला आहे. याद्वारे स्वच्छ आणि हरित शहरे बनण्यासाठी दीवने इतर शहरांसाठी आदर्श घालून दिला आहे. गेल्यावर्षीपर्यंत दीव, गुजरातकडून 73 टक्के ऊर्जा घेत होते.

यासंदर्भात, दीवमध्ये 50 हेक्‍टर, खडकाळ जमिनीवर 9 मेगावॅट सौर पार्क उभारण्याबरोबरच 79 सरकारी इमारतींवर सौर पॅनेल उभारून त्याद्वारे वार्षिक 1.3 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येते. सौर क्षमता आणखी वाढविण्यासाठी दीवने आपल्या रहिवाश्‍यांना घराच्या छपरावर 1 ते 5 मेगावॅट सौर पॅनेल बसवण्याकरिता 10 हजार ते 50 हजार अनुदान देऊ केले आहे. कमी खर्चातल्या सौर ऊर्जेमुळे घरगुती वीज दरात गेल्यावर्षी 10 टक्के तर यावर्षी 15 टक्के कपात झाली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)