दीर्घ पल्ल्यात महाराष्ट्रच आघाडीवर 

चार वर्षांत महाराष्ट्रात इतरांच्या तुलनेत सर्वाधिक गुंतवणूक 

मुंबई: काही दिवसांपूर्वी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार कर्नाटक हे देशातील सर्वाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे राज्य ठरले होते. यावरून महाराष्ट्रात विरोधकांनी भाजप सरकारला धारेवर धरले होते.

या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. गुंतवणुकीत कर्नाटक महाराष्ट्रापेक्षा सरस असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला.

विरोधकांनी टीका करताना दिलेली आकडेवारी ही गेल्या 9 महिन्यांतील आहे. या काळात कर्नाटकने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात बाजी मारली, हे खरे आहे. मात्र, गेल्या चार वर्षांमध्ये महाराष्ट्रातच सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे.

कर्नाटकमध्ये 92 प्रकल्प आले, तर त्याच्या तिप्पट प्रकल्प 275 आपल्या राज्यात आलेत. त्यामुळे महाराष्ट्र कुठेही कमी पडलेला नाही, असे देसाई यांनी सांगितले.

मेक इन इंडियाच्या घोषणेनंतर राज्यात चार लाख कोटींचे गुंतवणूक प्रकल्प साकार झाले आहेत. तर “मेक इन महाराष्ट्र’च्या माध्यमातून सहा लाख कोटींचे प्रकल्प राज्यात येतील, असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राने आणखी गुंतवणूक वाढावी याकरिता औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जमीन आणि पायाभूत सुविधा विकसित करण्याचे ठरविले आहे. सध्या अनेक इच्छुक कंपन्यांना पुरेशी जमीन मिळत नसल्यामुळे नाईलाजाने या कंपन्या इतरत्र जातात. महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ आणि चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे गुंतवणूकदारांचा व कंपन्यांचा कल महाराष्ट्राकडे असतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)