दीर्घ पल्ल्यात भारतीय शेअरबाजार उत्तम

    मध्यम पल्ल्यात 20 टक्‍के करेक्‍शनची शक्‍यता खुली – मार्क फेबर

नवी दिल्ली -दीर्घ पल्ल्यात भारतातील शेअरबाजार इतर देशापेक्षा जास्त परतावा देणार आहेत. मात्र, मध्यम आणि लघु पल्ल्यात काही परिरस्थितीजन्य घडामोडी घडल्या तर भारतीय शेअरबाजारात 20 टक्‍क्‍यांपर्यंत करेक्‍शन होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, असे जागतिक पातळीवरील ज्येष्ठ गुंतवणूकदार मार्क फेबर यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत भारतीय शेअरबाजार निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. 29 जानेवारीला मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 36400 अंकांवर गेला होता. आता त्यात 10 टक्‍के करेक्‍शन झाले आहे.

मात्र, आता जागतिक परिस्थिती लवचिक झाली आहे. त्याचबरोबर भारतात काही राज्यांत निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मध्यम पल्ल्यात भारतीय शेअरबाजारात करेक्‍शन होण्याची शक्‍यता खुली आहे. मात्र, दीर्घ पल्ल्यात भारतीय अर्थव्यवस्था किमान 6 टक्‍क्‍यांनी वाढणारच आहे. हा विकासदर जागतिक गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून जास्त आहे. त्यामुळे भारतीय शेअरबाजारात जागतिक गुंतवणूक येत राहण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्‍त केली.

निवडणुका आणि क्रुडचा थोडाफार परिणाम होऊ शकतो. मात्र, अजूनही बरीच लाल फित भारतात आहे. मोदी सरकारने ती कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ती अजूनही बरीच शिल्लक आहे. बॅंकांनी जरी काही अनुत्पादक मालमत्ता जाहीर केली असली तरी अजून बरीच जाहीर होणे राहिलेले आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून हे मुद्दे जास्त महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातच भारतील ब्ल्यू चीप शेअरमध्ये आवश्‍यकतेपेक्षा जास्त गुंतवणूक झाली असल्यामुळे ती संतुलित करण्याचा प्रयत्न गुंतवणूकदार करू शकतात, असे ते म्हणाले.

सेन्सेक्‍स 25 हजारांच्या खाली होता. तेव्हा भारतीय शेअरबाजारात खरेदी करण्याची चांगली संधी होती असे मी सांगितले होते. मात्र, आता मी तसे सांगणार नाही. कारण सेन्सेक्‍स पुरेसा वाढला आहे. जागतिक पातळीवर व्याजदर वाढीचे युुग सुरू झाले आहे. त्यामुळे भांडवल बाजारावर दबाव येत असल्याच्या बाबीकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, सध्याचे व्याजदर ऐतिहासिक दृष्टीने फार कमी पातळीवर आहेत. त्यात थोडीफार वाढ झाली तर फार फरक पडणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)