दीप-विर करणार प्रायव्हेट डेस्टिनेशन वेडिंग

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि रणवीर कपूर ही जोडी त्यांच्या लग्नाच्या चर्चेमुळे सध्या खुपच प्रसिद्धीच्या झोतात आहे. बॉलीवुडमधील हे लव बडर्स्‌ या वर्षाअखेर लग्नबंधनात अडकण्याची शक्‍यता आहे. काही दिवसांपूर्वी दीप-वीर मुंबई किंवा बंगळुरू येथे लग्न करणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता ही जोडी प्रायव्हेट डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचे समजते.

रणवीर आणि दीपिका हे दोघेही खासगी आयुष्याबाबत जाहीर चर्चा करताना दिसत नाही. यामुळेच दोघांनी ठराविक कुटुंबातील नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत लग्नसोहळा करू इच्छित आहे. विराष्ट-अनुष्कानेही नुकतेच डेस्टिनेशन वेडिंग केले होते. तसेच मोठा गाजावाजा करून कोट्यवधी रुपयांचा उधळपट्टी करण्याऐवजी डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा ट्रेंड आहे.

-Ads-

दीपिका-रणवीरच्या लग्नसोहळ्यानंतर मुंबई आणि बंगळुरू या दोन ठिकाणी रिसेप्शन होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच दोघांच्या कुटुंबियांकडून लग्नाची तयारी सुरू झाली असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, रणवीर-दीपिका ही जोडी 2013मध्ये “गोलियों की रास लीला ः रामलीला’ या चित्रपटापासून एकत्रित आली आहे. ब्लॉकबस्टर ठरलेल्या “बाजीराव मस्तानी’ आणि “पद्मावत’ चित्रपटातही दोघांनी दमदार अभिनय साकारत प्रेक्षकांची वाहवाह मिळविली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)