दीपोत्सवाने उजळले भक्‍ती-शक्‍ती समूहशिल्प

पिंपरी – निगडीवासियांनी पंधरा हजार पणत्या प्रज्ज्वलीत करून तिमिराकडून तेजाकडे जाण्याचा संदेश दिला. या दीपोत्सवामुळे भक्ती-शक्ती समूहशिल्प उजळून निघाले होते. पाडव्याच्या पहाटेचे हे नयनरम्य दृष्य अनेकांनी आपल्या डोळ्यात, कॅमेऱ्यात साठवून ठेवले.

निगडी येथील स्व.मधुकर पवळे प्रतिष्ठानच्या वतीने 15 हजार दिव्यांचा दीपोत्सव भक्ती शक्ती समूहशिल्प जवळ आयोजित करण्यात आला होता. विद्युत रोषणाईसह, भव्य रांगोळी व फटाक्‍यांची नेत्रदीपक आतषबाजी यावेळी करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून दीपोत्सवाला सुरुवात करण्यात आली. यानंतर नागरिकांनीही उत्साहाने दीपप्रज्ज्वलीत करून दीपोत्सवाचा आनंद लुटला. यावेळी महापौर राहुल जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, उद्योजक किरण चोपडा, चंद्रकांत पाटील, विपुल राठोड, किशोर गाथाडे, सचिन जाधव आदी उपस्थित होते.

नगरसेविका सुमन पवळे, दत्तात्रय पवळे, संतोष कवडे, विजय गांगुर्डे, अभिजित भालसिंग, रोहित कडेकर, सतिश झेंडे, शिरीष राऊत, हरिष सटानकार, दीपक पवार, गणेश फुगे, प्रतीक कोलते, बाळा मोरे, अनिकेत चव्हाण, कुणाल गवारे, हेमंत सटानकर यांनी संयोजन केले. संदीप कवडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)