दीपिका-रणवीर श्रीलंकेत साजरे करणार नववर्ष!

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण बॉलिवूडमधील बहुचर्चित कपल. त्यांची पडद्यावरील आणि पडद्यामागची केमिस्ट्री लोकांना फारच भावते. त्यांच्या प्रेमाच्या आणि ब्रेकअपच्या चर्चा अधूनमधून रंगत असतात. आता यांचे नववर्षाच्या प्लॅन्स काहीतरी नक्कीच स्पेशल असणार. रणवीर कामानिमित्त श्रीलंकेला जाणार आहे तर दीपिका सध्या ऑस्ट्रियामध्ये आहे. मात्र काम संपवून ती रणवीरला श्रीलंकेत भेटणार आहे.आणि प्रसारमाध्यमांपासून दूर जाऊन दोघे एकत्र सेलिब्रेशन करणार आहेत.

दोघांना एकत्र वेळ घालवायचा आहे. काही दिवसांपूर्वी रणवीर दीपिकाच्या वडीलांना भेटल्याने पुन्हा एकदा यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. दोघेही अऩेकदा प्रसारमाध्यमांसमोर एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. आता दीपिकाच्या वडीलांची रणवीरने भेट घेतल्यावरही अनेकांच्या भुवया उंचावल्या. रणवीर सिंह नुकताच बेंगळुरूमध्ये पादुकोन-द्रविड सेंटर फॉर स्पोर्टस एक्‍सलेंसच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये गेला होता. इथे राहुल द्रविड, अभिनव बिंद्रा, गीत सेठी आणि विश्वनाथ आनंद उपस्थित होते. इथेच रणवीरने प्रकाश पादुकोन यांची भेट घेतली. खरंतर या भेटीकडे दोघांच्या लग्नाचा संबंध जोडला जात आहे. पण अजूनतरी तसे काही समोर आले नाही. सध्या दोघांनाही “पद्मावती’च्या रिलीजकडे डोळे लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)