दीपिका-रणबीर पुन्हा एकत्रित

बॉलीवुडमधील डिंपल गर्ल दीपिका पादूकोण आणि रॉकस्टार रणबीर कपूर पुन्हा एकदा एकत्रित येणार आहेत. हे दोन्ही स्टार 19 एप्रिल रोजी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या फॅशन शोमध्ये रॅप वॉक करणार आहे. रणबीर आणि दीपिका 9 एप्रिल रोजी या शोमध्ये सहभागी होणार होते. मात्र, दोघांची तब्बेत बिघडल्याने हा शो काही दिवसांसाठी डीले करण्यात आला होता. हे दोघेजण शोचे शो स्टॉपर आहेत.

दीपिका पादुकोण आणि रणबिर कपूर ही जोडी सर्वप्रथम 2008मध्ये “बचना ऐ हसिनो’ या चित्रपटात प्रेक्षकांसमोर आली होती. त्यानंतर 2013मध्ये “ये जवानी है दिवानी’, 2015मध्ये “तमाशा’ चित्रपटात एकत्रित दिसले होते. या जोडीला प्रक्षकांकडून खूप पसंती मिळाली असून या जोडीला एकत्रित प्रेक्षक कायम उत्सूक असतात.दरम्यान, “रामलीला’, “बाजीराव-मस्ता’ आणि “पद्मावत’नंतर रणवीर-दीपिका जोडी चौथ्यांदा एकत्रित काम करणार आहे. या दोघांनी यशराज बॅनरसाठी एक चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा करणार असून हा चित्रपट कॉमेडी असण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)