दीपिका, प्रियांका चोप्रानंतर ‘या’ अभिनेत्रीची हॉलिवूडमध्ये एंट्री

जगात बॉलीवूडची क्रेझ किती आणि कशी आहे हे कोणालाही सांगण्याची गरज नाही त्यातच आपल्या बॉलीवूडचे आकर्षण हे हॉलीवूडला देखील आहे. इथले अभिनेते, अभिनेत्री नेहमीच हॉलीवूडकरांना भुरळ पडताना दिसतात. त्यामुळेच दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, अनिल कपूर, मल्लिका शेरावत यांच्यासह अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप हॉलीवूडमध्ये पाडली आहे. त्या सर्वांच्या यादीत आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश लवकरच होणार आहे. विशेष म्हणजे ही अभिनेत्री महाराष्ट्रीयन आहे.

अभिनेत्री राधिका आपटे लवकरच एका हॉलिवूडच्या चित्रपटात काम करणार आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धातली पहिली महिला वायरलेस ऑपरेटर आणि ब्रिटीश गुप्तहेर नूर इनायन खान ही भूमिका ती साकारेल. मिस अटकिन्स आर्मी असं या चित्रपटाचं नाव असून, तो इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन भाषेत केला जाईल. तिच्या हॉलीवूड एंट्रीची जोरदार चर्चा सध्या आहे.

-Ads-

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)