दीपिका पादुकोणने रणवीरसाठी रणबीरचा टॅटू हटवला

दीपिका आणि रणवीर सिंह यांचा बहुचर्चित विवाह एकदाचा संपन्न झाला. या विवाहाची छायाचित्रे प्रसिद्ध होताच त्यातील बारकाव्यांची चर्चाही जोरात सुरू झाली आहे. सर्वप्रथम चर्चा दीपिकाच्या चुनरीची सुरू झाली. यानंतर सुरू झाली ती तिच्या अंगठीची. ही अंगठी तब्बल दोन कोटी रुपयांची असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या अंगठीत एक आकर्षक हिराही दिसून येतो. गेल्या काही दिवसांपूर्वी दीपिकाने आपल्या विवाहासाठी एक कोटी रुपयांची ज्वेलरी खरेदी केल्याची माहिती प्रसिद्ध झाली होती. यामध्ये 20 लाखांच्या मंगळसूत्राचा समावेश होता.

रणवीर सिंहशी प्रेम करण्याअगोदर दीपिकाने रणबीर कपूरशी प्रेम केले होते. रणबीरसाठी तिने आपल्या मानेच्या मागे “आरके’ नावाचा टॅटू देखील बनवला होता. पण पुढे रणबीर आणि दीपिकामध्ये ब्रेक अप झाला. याच काळात दीपिकाचा हात पकडला रणवीर सिंहने. संयोगाने रणवीरचे नाव देखील आर पासूनच सुरू आहे. शक्‍य आहे की दीपिकाने रणवीर निवड यासाठीच केली असेल ज्याने तिचा टॅटू देखील जस्टिफाय होईल. रणवीरशी प्रेम केल्यानंतर देखील दीपिकाच्या मानेवर तो टॅटू होता, पण तो आता दिसत नाही आहे. दीपिका वेंडिंग रिसेप्शनसाठी बेंगळुरूकडे रवाना झाली. तेव्हाच टॅटू गायब झाल्याचे लक्षात आले होते.

दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नाच्या फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. आता दोघांच्या लग्नानंतर नेटिझन्सनी रणबीर कपूरची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. काही फोटोज शेअर करत युजर्सने लिहिले की, दीपवीरच्या लग्नात रणबीर कपूर या काही खास अंदाजात दिसला. त्यांच्या या खोचक टीकेवर रणबीर नक्कीच नाराज झाला असणार. दुसरीकडे आता रणबीर आणि आलियाच्या लग्नाचीही चर्चा सुरू झाली. मात्र आपल्या लग्नासाठी आणखी थोडे दिवस थांबावे लागेल, असे आलियाने म्हटले आहे. त्यामुळे रणबीर-आलियाचा विवाह नक्की होणार ना, अशी शंका उगाचच उपस्थित व्हायला लागली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)