दीपिका पादुकोणचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण

बॉलीवूडचा डॉन शाहरुख खानसोबत “ओम शांति ओम’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये यशस्वी पदार्पण करणा-या दीपिका पादुकोण हिने कॉकटेल आणि पद्मावत अशी सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आता ती चित्रपट दुनियेत नवीन पारीची सुरूवात करत आहे.

संजय लीला भन्साळीचा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण आता मेघना गुलजारच्या चित्रपटामध्ये झळकणार आहे. सोबतच ती या चित्रपटाची निर्मितीही करणार आहे. हा चित्रपट ऍसिड पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्या संघर्षावर आधारित असणार आहे.

याबद्दल दीपिका म्हणाली की, या चित्रपटाची कथा ऐकल्यावर माझे मन पूर्णतः हादरून गेले. कारण ही फक्त एका हिंसेची कथा नसून साहस, ताकद, आशा आणि विजयाची कथा आहे. लक्ष्मीच्या कथेने मला मनापासून प्रभावित केले. म्हणून मी भूमिकेसाठी तयार झाले. दरम्यान, या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरविण्यात आलेले नाही.

लक्ष्मी अग्रवाल यांच्यावर ऍसिड हल्ला झाल्यानंतरही त्यांनी हार न मानता स्वतःला सांभाळले. सोबतच आपल्यासारख्या अन्य महिलांना उभारी मिळावी यासाठी “स्टॉप ऍसिड अटॅक’ या नावाने अभियानही चालवत आहेत. मध्यंतरी त्या फॅशन शोमध्येही झळकल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)