दीपिका पदुकोण राहात असलेल्या इमारतीला भीषण आग

मुंबईप्रभादेवीतील वीर सावरकर मार्गावरील ब्यूमॉन्ट इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या 33 व्या मजल्याला ही आग लागली आहे. आगीची तीव्रता पाहून अग्नीशमन दलाच्या 10 गाड्या आणि 3 वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. सध्या आग विझवण्याचं काम सुरु आहे.

ही आग कशामुळे लागली याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. अग्निशमनदलाला या आगीची माहिती दुपारी 2 वाजून 16 मिनिटांनी मिळाली. याच इमारतीत अभिनेत्री दीपिका पदुकोण हीचे घर आणि ऑफिसही असल्याची माहिती मिळते. या इमारतीच्या 26 व्या मजल्यावर दीपिकाचा 4 बीएचकेचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट तिने 2010 मध्ये 16 कोटी रुपयांत खरेदी केला होता. याशिवाय अनेक उद्योजकांची कार्यालयंही या इमारतीत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ब्यूमॉन्ट इमारतीच्या 33 व्या मजल्याला आग लागली असली, तरी फायर ब्रिगेडकडे तेवढ्या उंचीची शिडीच उपलब्ध नाही. त्यामुळे ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)