दीपिका पदुकोण भडकली

दीपिका आणि रणवीर सिंह यांच्यातील रिलेशनशीपशी संबंधित काही ना काही बातम्या रोजच येत असतात. तशा तर बॉलिवूडमधील प्रत्येक कपलबाबत अशा बातम्या रोजच पसरत असतात. पण त्यावरून कोणी नाराज होत नाही. दीपिका आणि रणवीरचे तर आता लग्नही ठरले आहे. पण एका पार्टीमध्ये दीपिकाला त्यांच्या लग्नाविषयी काही प्रश्‍न विचारले गेले आणि त्यावर ती एकदम भडकलीच. तिचा चेहरा लालबुंद झाला. या प्रश्‍नाचे मी काहीही उत्तर देणार नाही, असे तिने फणकाऱ्याने सांगितले.

हा सगळा प्रकार मिडीयावाल्यांसमोरच घडला. त्यामुळे दीपिकाला असा काय प्रश्‍न विचारला गेला होता, याची चर्चा सुरू झाली. दिल्लीमध्ये “फाईंदिंग ब्युटी इन इन्परफेक्‍शन’ या विषयावर एका इव्हेंटमध्ये ती गेली होती. तिथे डिप्रेशनसारख्या विषयावर ती काही अनुभव शेअर करणार होती. तेवढ्यात प्रेक्षकांमधून कोणीतरी तिला रणवीरबरोबरच्या लग्नाबाबतचा प्रश्‍न विचारला. हा प्रश्‍न अगदीच असंवेदनशील आहे. ज्या विषयावर मी बोलणार आहे, त्याचा या विषयाशी काहीही संबंध नाही. म्हणून मी काहीही उत्तर देणार नाही, असे दीपिका ताडकन म्हणाली. तिच्या या रुद्रावताराला बघून सगळेच चाट पडले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)