दीपिका पदुकोणने दिले सलमानला जबरदस्त प्रत्युत्तर

काही दिवसांपूर्वीच सलमान खान म्हणाला होता, की त्याला आतापर्यंत डिप्रेशनमध्ये जाण्याची वेळ आलेली नाही. डिप्रेशन येणे हे एक श्रीमंतीचे लक्षण आहे. मात्र त्याने सहज केलेल्या या वक्‍तव्याला दीपिका पदुकोणने जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे. “डिप्रेशन’ येणे हे एका गंभीर आजाराचे लक्षण आहे.

कोणाचीही पार्श्‍वभुमी बघून कोणाला डिप्रेशन येत नाही. हे कोणालाही होऊ शकते. डिप्रेशन येणे हे काही श्रीमंतीचे लक्षण अजिबात नाही. ज्यांच्या जवळ भरपूर रिकामा वेळ आहे, त्यांनाच डिप्रेशन येते असे मानणे चुकीचे आहे. असा विचार करण्याची पद्धतच बदलली पाहिजे. नोकरी करणाऱ्याला, श्रीमंत अथवा गरीब कोणालाही डिप्रेशन येऊ शकते, असे दीपिका म्हणाली. सलमानच्या या वक्‍तव्यावर अनेकांनी कॉमेंट केल्या आहेत. काहींनी सलमानला असंवेदनशील म्हटले आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या विषयावर खुलेपणाने चर्चा करण्यासाठी तयार आहेत.

डिप्रेशन लपवणे चुकीचे आहे, असेही काहींचे मत आहे. दीपिकाला काही वर्षांपूर्वी आपण डिप्रेशनमध्ये असल्याचे एका कार्यक्रमात मान्य केले होते. त्यामुळे या विषयाबाबतची तिची मते स्वतःच्या अनुभवातून तयार झाली असणार हे नक्की.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)